नवी दिल्ली -चाहत्यांमुळेच मी हे यश पाहिले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच देशासाठी इतकी वर्षे खेळू शकलो. मी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर याच चाहत्यांनी माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या. या सर्वांचे आभार. काळजी करू नका मी लवकरच बरा होईन, अशा शब्दांत भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव निखंज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कपिल यांचा ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याने तसेच त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना फोर्टिस रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची ऍन्जिओप्लास्टीही करण्यात आली. संपूर्ण दिवस अतिदक्षता विभागात राहिल्यावर शनिवारी सकाळी त्यांनी आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला व आपण बरे आहोत, असा संदेशही पोस्ट केला.