सातारा -सदाशिव पेठ, मोती चौक सातारा येथील म्हसवडकर ज्वेलर्समध्ये दसरा दिवाळीनिमित्त बंपर धमाका योजना सुरु करण्यात आल्या आहेत. विनम्र सेवा, आकर्षक व नवीन डिझाईन्स, खात्रीशीर व्यवहार यामुळे म्हसवडकर ज्वेलर्स ग्राहकांच्या विश्वासस पात्र ठरली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत कार्यरत आहेत. म्हसवडकर ज्वेलर्सतर्फे दरवर्षी सण समासरंभानिमित्त ग्राहकांवर विविध ऑफर्सचा वर्षाव होत असल्याने सणानिमित्त सोन्याची खरेदी ग्राहकांसाठी फायद्याची ठरते. सणासुदीच्या निमित्ताने सोन्या-चांदीच्या दागिण्यांची खरेदी होत असते. म्हसवडकर ज्वेलर्सने या दागिण्यांमध्ये नाविण्यपूर्ण डिझाईन्स उपलब्ध केल्या आहेत. दसरा दिवाळीनिमित्त मंगळसूत्र, हार, नेकलेस, बांगड्या, पाटल्या, अंगठी, ब्रेसलेटसह विविध प्रकारच्या दागिन्यांनी शोरुम सजले आहे.
सोने व चांदीची मोड कॅरेटमिटर ग्राहकांसमक्ष तपासून त्याची किंमत केली जाते. दागिनी बदली करताना जुने व नवीन सोनं दरात अजिबात तफावत नाही या वर्षीही दसरा दिवाळीनिमित्त बंपर धमाका योजना सुरु आहे. या योजनांमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर तेवढ्याच वजनाची चांदी फ्री मिळणार आहे. तसेच फार्मिंग ज्वेलरीवर 10 टक्के सूट दिली जाणार आहे. सोने खरेदी करताना सोन्याचा दर कॅरेटप्रमाणे आकारला जातो.
जुने सोने, चांदी ग्राहकांसमोर कॅरटमीटरवर चेक करुन किंमत ठरविली जाते. या पेढीवर सर्व व्यवहार पारदर्शक असल्याने ग्राहकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही. दसरा दिवाळी बंपर ऑफर 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीपर्यंत सुरु रहाणार आहे. सातारकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन म्हसवडकर ज्वेलर्सतर्फे करण्यात आले.