मुंबई – मिलिंद सोमण या अभिनेत्याला बॉलीवूडमध्ये कलाकार म्हणून फारसे बस्तान बसवता आले नसले तरी प्रसिद्धी फोकस मात्र नेहमीच त्याच्याभोवती राहिला, याचे दोन कारण आहे पहिले कारण म्हणजे मिलिंदची स्टाईल आणि फिटनेस आणि दुसरे म्हणजे रिलेशनशिप स्टेटस.
यातच देश अनलॉक झाल्यानंतर मिलिंद सोमन आणि पत्नी अंकिता फॉरेन ट्रीपसाठी घराबाहेर निघाले आहेत. मिलिंद-अंकिता सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अमेरिकेत पोहचले आहेत. त्याचे काही रोमँटिक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अमेरिकेतील समुद्राच्या किनाऱ्यावरील रोमँटिक फोटो त्यांनी शेअर केला आहे. लॉकडाउनमध्ये घरातच अकिंताचा वाढदिवस साजरा केला होता. आता अनलॉक झाल्यानंतर विदेशवारीसाठी कपल गेलं आहे.