या वेब सीरिजने बदलले श्रेया चौधरीचे करियर

नुकतीच प्रदर्शित झालेली “बंदिश बॅन्डिट्‌स’ ही वेब सीरिज हिट ठरली. यात युवा अभिनेत्री श्रेया चौधरीने दमदार भूमिका साकारत चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक केल्याने श्रेया खूप खुष आहे. सीरिजमध्ये एका पॉपस्टारची भूमिका साकारणारी श्रेया म्हणाली, “मला वाटते की माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा बदल “बंदिश बॅंडिट्‌स’ घेऊन आला आहे.

ज्यामुळे चाहते माझ्या कामासाठी मला ओळखत आहेत. माझी प्रत्येक सकाळ ही चाहत्यांच्या मेसेजने सुरू होते आणि चाहत्यांच्या प्रेमापेक्षा कोणताही मोठा पुरस्कार नाही. या शोच्या यशाने तिच्या आयुष्यात कसे बदल घडले याविषयी श्रेया म्हणाली, “बंदिश बॅंडिट्‌स’ने मला अपेक्षेपेक्षा जास्त दिले. या लॉकडाऊनच्या काळात मला खूप मोठे यश मिळाले असल्याने मला आनंद झाला आहे.

श्रेया म्हणाली, या वेब सीरिजनंतर मला अनेक प्रपोजल येत आहेत आणि आशा आहे की, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी आगामी प्रपोजलविषयी बोलू शकेन. दरम्यान, “बंदिश बॅंडिट्‌स’पूर्वी श्रेयाने चित्रपट निर्माता इम्तियाज अली यांच्या “द अदर वे’ आणि “डियर माया’मध्ये निर्णायक भूमिका साकारल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.