लॉकडाऊनमध्ये बिग बी यांनी केली घराची साफसफाई

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन बहुतेकदा आपल्या रिऍलिटी शो “कौन बनेगा करोडपती’मध्ये आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे करत असतात. केबीसीत अमिताभ अनेकदा स्पर्धकांना काही वैयक्‍तिक प्रश्‍न विचारतात आणि कधीकधी स्वतःबद्दलच्याही काही गोष्टी सांगतात.

“कौन बनेगा करोडपती’च्या 12व्या मोसमातही त्यांनी काही गोष्टी शेअर केल्या आहेत. अलीकडच्या एका भागात अमिताभनी लॉकडाऊनमध्ये घरात काय काय केले याचा खुलासा केला. वास्तविक, स्पर्धक रूना शहा म्हणाली, लॉकडाऊनच्या काळात घरातील बरीच कामे करावी लागली. यानंतर शोची एक्‍स्पर्ट ऋचा अनिरुद्धने बिग बींना विचारले की लॉकडाऊनच्या काळात तुम्ही घरकाम केले का?

यावर बिग बी म्हणाले, “बिल्कुल… मी सर्व कामे केली, झाडू आणि पोछाही केला, पण मला स्वयंपाक येत नव्हता. ते सोडून सर्व काम केले आणि अद्यापही करत आहे.’ यानंतर ऋचाने आश्‍चर्य व्यक्‍त केले. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अमिताभ बच्चन आगामी “ब्रह्मास्त्र’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. याशिवाय ते “चेहरे’ आणि “झुंड’मध्येही झळकणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.