मुंबई – काल शेअरबाजाराचे निर्देशांक अडीच टक्क्यांनी कोसळले होते. आज थोडीफार शेअर खरेदी झाल्यामुळे निर्देशांकांत सुधारणा झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 254 अंकांनी म्हणजे 0.64 टक्क्यांनी वाढून 39,982 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 82 अंकांनी वाढून 11,762 अंकांवर बंद झाला.
काल माहिती तंत्रज्ञान, बॅंकिंग आणि धातू क्षेत्राचे निर्देशांक कोसळले होते. त्यामुळे आज या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला.