नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे दुसऱ्या तिमाहीत माहिती तंत्रज्ञान कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करू लागल्या आहेत.
टीसीएस, विप्रो, इन्फोसिसनंतर एचसीएल टेक् कंपनीने दुसऱ्या तिमाहीचा चांगला नफा असलेला ताळेबंद जाहीर केला. एचसीएल टेक् कंपनीला दुसऱ्या तिमाहीत झालेल्या नफ्यात 18.5 टक्क्यांची वाढ होऊन तो 3,142 कोटी रुपये झाला आहे.
कंपनीचा महसूल 6.1 टक्क्यांनी वाढून 18,594 कोटी रुपये झाला आहे. आगामी काळात महसूल दीड ते अडीच टक्क्यांनी वाढेल, असे कंपनीने म्हटले आहे.