दुबई – सलामीवीर फाफ डुप्लेसी व शेन वॉटसन यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 10 गडी राखून पराभव करत यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सर्वांत मोठा विजय नोंदवला.
💔#SaddaPunjab #IPL2020 #KXIP #KXIPvCSK pic.twitter.com/3NchUkxY5h
— Kings XI Punjab (@lionsdenkxip) October 4, 2020
विजयीलक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना चेन्नईने 18व्या षटकांतच एकही गडी न गमावता 181 धावा करत विजयाची नोंद केली. डुप्लेसीने 53 चेंडूत 11 चौकार व 1 षटकार फटकावून नाबाद 87 धावांची खेळी केली. तर त्याला योग्य साथ देताना वॉटसनने तितक्याच चेंडूत 11 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 83 धावा केल्या. वाॅटसन सामनावीर ठरला.
A special knock from Shane Watson gets him the Man of the Match award for his scintillating knock of 83* off 53 deliveries.
Watto knock 👌👌 #Dream11IPL pic.twitter.com/hLB85ScCAG
— IndianPremierLeague (@IPL) October 4, 2020
तत्पूर्वी, कर्णधार लोकेश राहुलच्या दमदार खेळीनंतरही चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या धावसंख्येला ब्रेक लावला. राहुलबरोबरच आक्रमक फलंदाजी करत असलेल्या निकोलस पुरनलाही वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने बाद करत सामन्यावर चेन्नईचे वर्चस्व निर्माण केले.
नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार राहुल याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने मयंकसह संघाला पुन्हा एकदा अर्धशतकी सलामी दिली. मात्र, यंदाच्या स्पर्धेत सातत्याने सरस कामगिरी करत असलेल्या मयांक आग्रवालला लवकर बाद करण्यात चेन्नईला यश आले.
लेगस्पीनर पियुष चावलाने मयंकला 26 धावांवर बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. त्यानंतर यंदाच्या स्पर्धेत पहिलाच सामना खेळत असलेला मनदीप सिंगने राहुलच्या साथित संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तो देखील आक्रमक फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात 27 धावांवर रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर अंबाती रायडूकडे झेल देत बाद झाला.
राहुलला सुरेख साथ करत निकोलस पुरनने संघाच्या दीडशतकी धावा फलकावर लावल्या. 17 चेंडूत 1 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 33 धावा करणाऱ्या पुरनला ठाकूरने बाद केले. त्यानंतर त्याने दमदार अर्धशतकी खेळी केलेल्या राहुललाही बाद करत पंजाबच्या धावसंख्येला ब्रेक लावला.
ग्लेन मॅक्सवेल व सर्फराज खान यांनी धावांचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकवेळ द्विशतकी धावसंख्या गाठतील असे वाटत असलेल्या पंजाबचा डाव 4 बाद 178 असा रोखला गेला. सलग तीन सामन्यांत पराभूत झालेल्या चेन्नईने या विजयासह पराभवांची मालिका खंडित केली.
संक्षिप्त धावफलक :-
किंग्ज इलेव्हन पंजाब – 20 षटकांत 4 बाद 178 धावा. (लोकेश राहुल 53, निकोलस पुरन 33, मनदीप सिंग 27, मयंक आग्रवाल 26, शार्दुल ठाकूर 2-27). चेन्नई सुपर किंग्ज – 17.4 षटकांत बिनबाद 181 धावा. (फाफ डुप्लेसी नाबाद 87, शेन वॉटसन नाबाद 83)