दुबई – करोनामुळे भारतात होणारी आयपीएल स्पर्धा यंदा अमिरातीत होत आहे. गेल्या मार्च महिन्यापासून ही स्पर्धा सुरू होणार होती. मात्र, त्याचवेळी करोनाचा धोका वाढल्यामुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकली गेली. त्यानंतर अमिराती क्रिकेट मंडळाने ही स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव बीसीसीआयला दिला होता तो मान्य करत यंदा ही स्पर्धा अमिरातीत सुरू झाली आहे.
स्पर्धेत आतापर्यंत 14 सामने झाले आहेत आणि आज दोन सामने पार पडत आहेत. स्पर्धेत गुणतालिकेत मुंबईचा संघ अव्वल स्थानावर आहे. तर चेन्नईचा संघ अंतिम स्थानावर आहे. अजून खूप सामने बाकी असून या क्रमवारीत बदल होऊ शकतो. आतापर्यंत या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी करत विक्रम आपल्या नावे केले आहेत, तसेच अनेक विक्रम करण्याची संधी देखील खेळाडूंना आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएल 2020 स्पर्धेतील काही ठळक घडामोडीचा आढावा घेतला आहे. तो खालीलप्रणाणे –
स्पर्धेतील ठळक घडामोडी –
(1) दुबईच्या मैदानावर आतापर्यंत झालेल्या सर्व सहा सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी
(2) सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनण्याची रोहितला संधी
- प्रथम स्थानी विराट कोहली तर, दुसऱ्या स्थानावर सुरैश रेना
- कोहलीच्या 169 सामन्यांत 5 हजार 427 धावा
- रैनाच्या 193 सामन्यांत 5 हजार 368 धावा
(3) रोहितकडून 5 हजार धावांचा टप्पा पार आता रैनाला मागे टाकण्याची संधी
(4) स्पर्धेत 200 षटकार मारणारा रोहित दुसरा भारतीय खेळाडू
- पहिल्या स्थानावर महेंद्र सिंह धोनी
- धोनीचे 190 सामन्यातून 212 षटकार
- गेल 125 सामन्यांतून 326 षटकारांसह पहिल्या स्थानी
- एबी डिव्हिलियर्सचे 156 सामन्यातून 125 षटकार
(5) धोनीने रैनाला टाकले मागे
- आयपीएच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा भारतीय
- 194 व्या सामन्यात सहभाग
- 164 सामने चेन्नईकडून
- 30 सामने रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून
(6)सर्वाधिक 9 अंतिम सामने खेळण्याचा धोनीचा विक्रम
(7) एकाच संघातून सर्वात जास्त सामने कोहलीच्या नावावर