रोम –अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत आपला ठसा उमटविणारा कॅनडाचा टेनिसपटू डेनिस शापलोव्ह याने इटालियन टेनिस स्पर्धेतही आपली घोडदौड कायम राखली आहे.
या स्पर्धेतील सामन्यात शापलोव्हने स्पेनच्या पेड्रो मार्टिनेजचा 6-4, 6-4 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. अमेरिकन स्पर्धेत शापलोव्हने एकेरी व दुहेरी अशा दोन्ही गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. नवोदित खेळाडू असूनही त्याच्या गुणवत्तेची आता सातत्याने चर्चा होत आहे. शापलोव्हने भारताच्या रोहन बोपण्णाच्या साथीत पुरुष दुहेरीत खेळताना जुआन सॅबेस्टियन कॅबेल व रॉबर्ट फराह या जोडीचा 3-6, 6-3, 10-5 असा पराभव केला.