चेन्नई – भारताचा ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू पी. हरिकृष्णा सेंट लुईस जलद ऑनलाइन बुद्धिबळ
स्पर्धेत पाचव्या स्थानावर घसरला आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या तीन फेरीत संयुक्त आघाडी घेणारा हरिकृष्णाला इयान नेपोमनियाची याच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतरच्या सामन्यात त्याला स्पर्धेचा संभाव्य विजेता ग्रॅण्डमास्टर मॅग्नस कार्लसनकडून पराभूत व्हावे लागले. त्यामुळे गुणतालिकेत त्याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.