नवी दिल्ली – देशात आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी करोनाचे 90 हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या 24 तासांत देशात एकूण 90 हजार 802 रुग्ण आढळून आले असल्याचे आज सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे, देशातील करोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या आता 42 लाख 4 हजार 613 इतकी झाली आहे.
मृतांचा आकडा 71 हजार 642 इतका असून मृत्यूदर आता 1.70 टक्के इतका नोंदवला गेला आहे. देशात सध्या करोनाचा ऍक्टिव्ह रुग्ण 8 लाख 82 हजार 542 इतके आहेत. एकूण रुग्णांच्या संख्यात ही टक्केवारी 20.99 इतकी आहे.
देशभरात करोनाने आतापर्यंत जे 71 हजार 642 रुग्ण मरण पावले आहेत त्यातील सर्वाधिक 26 हजार 604 रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. अन्य राज्यांतील मृतांचे प्रमाण असे – तामिळनाडु 7836, कर्नाटक 6393, दिल्ली 4417, आंध्रप्रदेश 4417, उत्तरप्रदेश 3920, पश्चिम बंगाल 3562, गुजरात 3105, पंजाब 1862 असे आहे.