सूर्याची सर्वात सुस्पष्ट छायाचित्र मिळवण्यात यश

माद्रिद : युरोपमधील एका अत्यंत आधुनिक अशा दुर्बिणीने सूर्याची आतापर्यंतची सर्वात सुस्पष्ट छायाचित्रे मिळवण्यात यश मिळवले आहे. ही छायाचित्र जेवढी आश्चर्यचकित करणारी आहेत तेवढीच भीतीदायक दिसत आहेत. स्पेनच्या भूमीतून अंतरालावर नजर ठेवणाऱ्या जर्मनीतील काही वैज्ञानिकांनी ग्रेगोर दुर्बिणीच्या मदतीने ही हाय रिझोल्युशन छायाचित्रे टिपली आहेत.

लेबनीज इन्स्टिट्यूट फॉर सोलर फिजिक्सच्या शास्त्रज्ञांनी या दुर्बिणी मध्ये काही बदल करून त्याच्या लेंसच्या डिझाईन मध्ये काही सुधारणा केल्याने सूर्याची ही सुस्पष्ट छायाचित्रे उपलब्ध होऊ शकली आहेत. या छायाचित्रांच्या मदतीने शास्त्रज्ञांना आता सूर्याची चुम्बकीय क्षमता सूर्यावरील डाग सौर मंडळातील इतर अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. 

या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ही छायाचित्रे इतकी सुस्पष्ट आहेत की, जणू काही ती फक्त 48 किलोमीटर अंतरावरुनच खेचण्यात आली असावेत. या प्रकल्पाचे नेतृत्व एका महिला डॉक्टरने केले आहे. लुसिया क्लिइंट असे या महिला शास्त्रज्ञाचे नाव असून हा रोमांचकारी अनुभव सांगताना त्या म्हणतात की, “हा अत्यंत एक आव्हानात्मक असा प्रकल्प होता. फक्त एक वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही महत्त्वाचे असे बदल केले. ज्यामुळे सूर्याची ही छायाचित्रे उपलब्ध होऊ शकली”. 

स्पेनलाही करोना महासंकटाचा मुकाबला करावा लागत असल्याने शास्त्रज्ञांची ही मोहीम थोडीशी लांबली होती, पण जुलै महिन्यामध्ये जेव्हा स्पेनमध्ये सारेकाही खुले झाले तेव्हा शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा वेगाने या मोहिमेला सुरुवात केली. सूर्याची अत्यंत सुस्पष्ट अशी छायाचित्रे मिळवण्यात या शास्त्रज्ञांना यश आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.