पुणे – मार्केट यार्डातील फुल बाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक घटली आहे. पितृपंधरवडा सुरू असल्याने या काळात शुभकार्य होत नाही. त्यातच मंदिरे बंद असल्याने फुलांना अत्यल्प मागणी आहे. परिणामी घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या फुलांच्या भावात 60 ते 70 टक्क्यांनी घट झाली.
गणेशोत्सवात फुलांना मागणी वाढून भावही चांगले मिळाले होते. आता पितृपंधरवड्यात मागणी नसल्याने भावात घसरण झाली आहे. आता नवरात्रौत्सव आणि दसऱ्याला फुलांना मागणी वाढून भावातही तेजी येईल, अशी माहिती मार्केट यार्डातील फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव
झेंडू : 20-40, गुलछडी : 10-30, बिजली : 30-50, कापरी : 20-40, सुट्टा कागडा 100-200, शेवंती : 10-30, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 2-10, गुलछडी काडी : 5-15, डच गुलाब (20 नग) : 10-30, लिली बंडल : 10-15, जर्बेरा : 5-15, कार्नेशियन : 10-40.