जिल्ह्यात एकाच दिवसांत 496 अहवाल पॉझिटिव्ह; नऊ नागरिकांचा मृत्यू
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात दिवसेंदिवस करोनाबाधितांच्या संख्येत मोठी भर पडत असून विक्रमी संख्येने अहवाल पॉझिटिव्ह येथ आहेत. आरोग्य विभागाने सोमवारी (दि. 24) रात्री जाहीर केलेल्या अहवालांनुसार एकाच दिवसात तब्बल 496 नागरिकांना नव्याने करोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, नऊ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या म्हसवड, ता. माण येथील 65 वर्षीय महिला, पुसेगाव, ता. खटाव येथील 68 वर्षीय महिला, प्रतापसिंहनगर, सातारा येथील 69 वर्षीय महिला, पाटील नर्सिंग होम, सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, कोलवडी, ता. कोरेगाव येथील 62 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, सातारा येथील 61 वर्षीय पुरुष, अमृतवाडी, ता. वाई येथील 48 वर्षीय पुरुष, कराड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या राहटणी, ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, अशा नऊ बाधितांचा मृत्यू झाला.
कराड तालुक्यातील मलकापूर येथे कोयना वसाहत दोन, कृष्णा मेडिकल कॉलेज, आगाशिवनगर प्रत्येकी तीन, शहरात अन्यत्र 15, गजानन हौसिंग सोसायटी एक, कराड शहरात मंगळवार पेठ दहा, शनिवार पेठ, विद्यानगर प्रत्येकी सात, सोमवार पेठ, शुक्रवार पेठ प्रत्येकी सहा, गुरुवार पेठ पाच, कार्वे नाका, बुधवार पेठ प्रत्येकी तीन, रविवार पेठ दोन, उपजिल्हा रुग्णालय एक, शहरात अन्यत्र 11, रेठरे खुर्द आठ, किवळ, खुबी प्रत्येकी सहा, वारुंजी, ओंड प्रत्येकी चार, कापिल, शेणोली, सैदापूर प्रत्येकी तीन, उंब्रज, गोळेश्वर, रेठरे बुद्रुक, बोरगाव, शेळगाव प्रत्येकी दोन, शास्त्रीनगर, गोवारे, साळशिरंबे, मुंडे, शिराळा नाका, धोंडेवाडी, कोळे, पेरले, खराडे, तांबवे, शिवाजी हौसिंग सोसायटी, माळवाडी-मसूर, अंतवडी-मसूर, चचेगाव, कोणेगाव, विजयनगर, राधागोविंद संकुल, घारेवाडी, वाठार कॉलनी, करवडी, पाडळी, बेलवडे बुद्रुक, इंदोली प्रत्येकी एक, पाटण तालुक्यातील पाटण, तारळे प्रत्येकी तीन, बनपुरी, मरळी प्रत्येकी दोन, तळमावले, नाडे नवारस्ता, आंदुळ, ढेबेवाडी, बेलवडे खुर्द, बेलवडे, आब्रुंळे, नारळवाडी, विहे, कार्ले, सातारा तालुक्यातील सम्राटनगर 13, परळी दहा, सातारा शहर आठ, मंगळवार पेठ, गोडोली प्रत्येकी सात, शनिवार पेठ सहा, पारसनीस कॉलनी, सोमवार पेठ, सदरबझार प्रत्येकी तीन, रामाचा गोट, व्यकटपुरा पेठ, शुक्रवार पेठ, माची पेठ, बोगदा, जिल्हा रुग्णालय, कारागृह, श्रीमान हॉटेलजवळ प्रत्येकी एक, भाटमरळी, करंजे प्रत्येकी चार, पीरवाडी तीन, शाहूपुरीत जि. प. कॉलनी दोन, तामजाईनगर, दौलतनगर प्रत्येकी एक, जुळेवाडी दोन, कोडोली, पाडळी, चिंचणेर, कण्हेर, आंबेदरे, पळशी, आसगाव,
प्रतापसिंहनगर, विकासनगर, कर्मवीर कॉलनी, फत्यापूर, तानाजीनगर, राजेवाडी, संभाजीनगर (एमआयडीसी), सासपडे, अतीत, इंगळेवाडी (नुने), सैदापूर, कारंडवाडी, सत्वशीलनगर, संगम माहुली, डबेवाडी, गोवे, आरफळ प्रत्येकी एक, खटाव तालुक्यातील पुसेसावळी 12, चोराडे सहा, मायणी, डिस्क्ळ प्रत्येकी चार, खातगुण, वांजोळी प्रत्येकी तीन, तडवळे, वडगाव प्रत्येकी दोन, खटाव, पुसेगाव, नांदोशी, वेटणे, औंध, वडूज, विसापूर, दरजाई, धकटवाडी प्रत्येकी एक, वाई तालुक्यातील बावधन पाच, उडतारे चार, वाई शहरात मधली आळी चार, नंदनवन रेसीडन्सी दोन, गंगापुरी, एमआयडीसी प्रत्येकी एक, भुईंज, कवठे प्रत्येकी दोन, विरमाडे, आसले, देगाव, कुंभारवाडी, अमृतवाडी, पाचवड प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यातील धामणेर पाच, रहिमतपूर तीन, कोरेगाव पोलीस स्टेशन दोन, अन्यत्र एक, किन्हई, चिंचणी, पिंपोडे खुर्द प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यातील लोणंद शहरात दहा, पोलीस ठाणे एक, धावरेनगर सात, शिरवळ येथे शिर्के कॉलनी तीन, स्टार सिटी दोन, बाजार पेठ, संघर्ष कॉलनी, अन्यत्र प्रत्येकी एक, भिसे वस्ती दोन, भादे, विंग, नायगाव, वाण्याचीवाडी प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यात संगमनगर 20,
महाबळेश्वर शहरात पालिका, रांजणवाडी प्रत्येकी तीन, मारी पेठ दोन, पाचगणी एक, माण तालुक्यात म्हसवड सहा, फलटण तालुक्यातील गोखळी आठ, नाईकबोमवाडी सहा, फलटण शहरात सोमवार पेठ चार, मलठण तीन, मंगळवार पेठ दोन, रविवार पेठ, उमाजी नाईक चौक, भैरोबा गल्ली, मारवाड पेठ, जिंती नाका, स्वामी विवेकानंदनगर, डेक्कन चौक व अन्यत्र प्रत्येकी एक, शिंदेनगर, हिंगणगाव, जाधववाडी प्रत्येकी दोन, वरवंड, राजुरी, रणदिवे मळा, निंबळक वाजेगाव, विठ्ठलवाडी, हनुमंतनगर प्रत्येकी एक, जावळी तालुक्यातील कुडाळ दोन, इतर पाच, बाहेरील जिल्ह्यातील सांगली, बावडा, इस्लामपूर, येडेमच्छिंद्र, किल्लेमच्छिंद्र प्रत्येकी एक, असे एकूण 496 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.