अहमदाबाद – तुफान पावसामुळे गुजरातमधील 130 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्याने तसेच ओढा नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने दक्षतेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
बंद करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये एक राष्ट्रीय महामार्ग आणि सात राज्य मार्गांचा समावेश आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या शनिवारी आणि रविवारी गुजरातेत तुफानी पावसाची शक्यता आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळीही राज्याच्या अनेक भागात तुफानी पाऊस झाला. कच्छ, उत्तर आणि दक्षिण गुजरात प्रांतात आज मध्यम ते जोरदार स्वरूपाची वृष्टी झाल्याचे राज्य सरकारच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आणंद, भडोच, सुरत, जुनागड, पोरबंदर, गिर सोमनाथ आदी जिल्ह्यांतील अनेक रस्त्यांचा बंद करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये समावेश आहे.