बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने 11 ऑगस्ट रोजी आपल्या बर्थडे सेलिब्रेट केला. या खास दिवसानिमित्त दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांनी तिला विशेष भेट दिली आहे. त्यांनी आपल्या आगामी “किक-2′ चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून तिचे नाव जाहीर केले आहे. या चित्रपटाची आधिच घोषणा झाली असून यात सलमान खान मुख्य भूमिका साकारत आहे.
साजिद नाडियादवालाची पत्नी वर्धाने सोशल मीडियावर याबाबत माहिती शेअर करत लिहिले की, तुला वाढदिवसानिमित्त ही खास भेट आहे. याबाबत मला औपचारिक घोषणा करताना आनंद होत आहे की, सकाळी चार वाजताच साजिदने आपल्या चित्रपटाची पटकथा लॉक केली आहे. या कथेत तुझीही भूमिका दमदार असणार आहे. सलमानसोबत लवकरच “किक-2’चे शूटिंग सुरू करण्यात येईल.
या ट्विटला रिट्विट करत जॅकलीनने पोस्ट केले की, आता या चित्रपटाची प्रतीक्षा करू शकत नाही. दरम्यान, जॅकलीनचे सलमान सोबतचे “तेरे बिना’ हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले होते. ज्याला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.
तसेच “किक’ चित्रपटातून जॅकलीन फर्नांडिसला चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख मिळाली आहे. या चित्रपटात सलमान खानसोबतची तिची जोडी खूपच सुपरहीट ठरली होती. तिची सुंदरता आणि अभिनयालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.