मुंबई – सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी केंद्राकडून अधिकृत सूचना मिळाल्यानंतर सीबीआयने एफआयआर दाखल करत तपासाला सुरु केला आहे. बिहार सरकारने विनंती केल्यानंतर तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सर्वात आधी एफआयआर दाखल करणाऱ्या बिहार पोलिसांच्या आपण संपर्कात असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. सुशांत सिंहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे बिहार पोलिसांनी अभिनेत्री आणि कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.