पिंपरी – सलग तिसऱ्या दिवशी पावसाने शहर परिसरात हजेरी लावली. परंतु गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या संततधारेने गुरुवारी सायंकाळी मात्र काहीसा विश्राम घेतला.
गुरुवारी दुपारीनंतर पावसाने काहीशी उघडीप दिल्याने दुपारनंतर दैनंदिन व्यवहार काही प्रमाणात सुरळीत सुरु झाले. तरीदेखील दिवसभर नागरिकांची वर्दळ मात्र तुलनेत कमी होती.
शहरात मंगळवारी (दि.4) पावसाने दमदार हजेरी लावली. बुधवारी मध्यरात्री आणि गुरुवारी पहाटे मात्र पावसाने चांगलाच जोर धरला होता. परंतु हवामान खात्याचा गुरुवारी मुसळधार पावसाचा पडण्याचा अंदाज फोल ठरवत, दुपारनंतर पावसाने उघडीप दिली.