कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील 79 गावाच्या विविध समस्यासह नैसर्गिक आपत्तीच्या काळात योग्य नियोजन करुन तालुक्यातील जनतेला प्रशासकीय लाभाबरोबर विविध दाखले वेळेत देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवणे, महसुली वर्ष सन १९-२० या वर्षात गौणखनिज,अवैद्य वाळू उपसा प्रतिबंधात्मक अंतर्गत दंडात्मक कारवाई करुन कोट्यावधीचा महसूल गोळा करून शासनाच्या तिजोरीत जमा करीत सर्वच बाबतीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सन्मानित करण्यात आले.
मसुलमंत्री बाळासाहेब थोरात,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,कृषी मंत्री दादा भुसे व जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी आदी प्रमुख मान्यवर ऑनलाईन उपस्थितीत होते. यावेळी कोपरगाव चे तहसीलदार चंद्रे यांच्या कार्याचा गौरव करीत मान्यवरांनी उत्कृष्ठ तहसीलदार म्हणून सन्मानीत केले .
दरम्यान चंद्रे यांनी आपल्या कार्यकाळात स्थानिक प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांचे सांघीक कर्तव्य एकवटले, तालुक्यात आलेली पुरस्थिती,अतिवृष्टी, करोनाचे चालु असलेले महासंकट यात योग्य भुमिका बजावत तालुका सुरक्षीत ठेवण्याचा प्रयत्न. तसेच , समृद्धी महामार्गाचा भूसंपादनाच्या जठील कामात यशस्वी भूमीका बजावून शेतकरी शासन यांचा संगम केला.
डिझिटल सातबारा संगणकीय प्रणालीत तालुक्याला अव्वल क्रमांक मिळवुन दिला. दंडात्मक महसुल गोळा करण्यात तहसीलदार चंद्रे यांचा दबदबा आहे त्यामुळे गेले अनेक वर्ष शेकडो वाहने तहसील परिसरात पडून होते त्यांची रितसर शासकीय दंडात्मक विल्हेवाट लावून बुडीत महसूल वसुल केला. तालुक्यातील वादग्रस्त शिवरस्ते,इतर वाटा, शेतजमीनीचे प्रलंबित प्रश्न निकाली काढून अनेकांचे मार्ग मोकळे केले.
दरम्यान तहसीलदार योगेश चंद्रे हे हजरजबाबी व कर्तव्याला प्राधान्य देणारे तहसीलदार असुन अशा अधिकाऱ्यांची प्रत्येक ठिकाणी गरज आहे असे म्हणत खासदार सदाशिव लोखंडे यांनी चंद्रे यांचा सन्मान केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, नितीन औताडे, उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, कैलास जाधव, शहर प्रमुख सनी वाघ, गुरसळ उपस्थित होते.