मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत गुणवत्तेच्या जोरावर लोकप्रियता मिळवूनही आत्महत्या करून जीवन संपवलेल्या सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूच्या विषयाचा दि एन्ड होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. सुशांत सिंगच्या संदर्भात त्याचे नातेवाईक आणि मित्र वेगवेगळी भूमिका मांडून हा गोंधळ अधिकच वाढवत आहेत.
तर दुसरीकडे सुशांत सिंगच्या मृत्यूला त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती जबाबदार आहे, अशी थेट तक्रार सुशांत सिंगच्या वडिलांनी केली आहे. यामुळे आता सुशांत सिंगच्या संदर्भात त्याचे नातेवाईक आणि मित्र रिया विषयी सोशल माध्यमांमध्ये आपलं मत व्यक्त करत आहे. सध्या सोशल मीडियावर रिया चक्रवर्तीला चांगलेच ट्रोल केले जात आहे.
यातच सुशांतच्या मैत्रिणीने क्रिसन बॅरेटो हिने मौन सोडलं असून सुशांतच्या आयुष्यात रिया आल्यामुळे सारं चित्र बदललं असं सांगितलं आहे. रियामुळे सुशांतच्या वागण्यात फार मोठे बदल झाले होते ते आम्हाला दिसून येत होते. त्याच्या वडिलांनी देखील सांगितलं की सुशांत आणि कुटुंबीयांचं बोलणं होत नव्हतं. सुशांतने आम्हाला मोठी स्वप्न पाहायला शिकवलं पण रिया आली आणि सगळंच बदललं. रिया चक्रवर्ती, सत्य एक ना एक दिवस नक्कीच उघड होईल, असं क्रिसन बॅरेटो म्हणाली.
“सुशांतच्या आयुष्यात रिया आल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. सुशांत आणि आमचा संपर्क कमी झाला. रिया कधीच त्याला कोणत्या मित्र-मैत्रिणींसोबत जास्त बोलू देत नव्हती. त्याचा फोन नंबरदेखील सतत बदलत रहायचा. त्यामुळे त्याचं आणि आमचं बोलणं होत नव्हतं”,