पुणे – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुण्यात दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका खासगी रुग्णालये सुद्धा ताब्यात घेत आहे. मात्र, पालिकेचेच कमला नेहरू रुग्णालय हे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अद्यावयत यंत्रणाअभावी करोना काळात वापरात नाही. याविरोधात आज करोनाविरोधी जन अभियानांतर्गत नागरिकांनी मनपासमोर आंदोलन केले आहे.
करोनाचा मुकाबला करण्यासाठी पुण्यात जम्बो हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. मात्र, मनपाची काही हॉस्पिटल बंद आहेत. ही हॉस्पिटल तातडीने सुरु करण्यात यावी, या मागणीसाठी मनपा भवनासमोर आंदोलन करोनाविरोधी जन अभियानांतर्गत नागरिकांनी आंदोलन केले. यावेळी कमला नेहरू रुग्णालयातील बंद असलेला मेडिकल आयसीयू तातडीने सुरु करा, त्यासाठी तज्ञ डॉक्टर आणि नर्सेसची भरती करावी. तसेच पुणेकरांचा पैसा नीट वापरा, बंद रुग्णालये सर्वात आधी सुरु करा, अशी मागणी करण्यात आली आहे.