मुंबई – सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात त्याच्या कुटुंबियांकडून प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात बिहार पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता दुसरीकडे या देशातील राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देत प्रकरणी देशातील अनेक नेत्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.
#SushantSinghRajputMurderCase मामले में #MumbaiPolice की हालिया कार्यवाई ने पूरे देश को हैरत में डाल रखा है।#BiharPolice @Jduonline @NitishKumar pic.twitter.com/qxrJRVRTw3
— rajiv ranjan Prasad (@RajivRanjanJDU) August 4, 2020
यातच बिहारमधील सत्ताधारी पक्ष असणारा जनता दल यूनायटेडने उघडपणे मतप्रदर्शन करत आपली भूमिका मांडली आहे. काही लोक स्वत:ला वाचवण्यासाठी रिया चक्रवर्तीची हत्याही करु शकतात अशी शक्यताही जेडीयूच्या पक्षाचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी व्यक्त केली आहे.
ते पुढे म्हणाले,’जेडीयूच्या प्रवक्त्यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा दिशा सालियनच्या ‘हत्ये’शी संबंध असल्याचे दिसत आहे असं म्हटलं आहे.
तत्पूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त करत महाराष्ट्र सरकारशी याबाबत चर्चा करणार असल्याचे सुद्धा म्हटले होते.