मुंबई – लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आयुष्यात मैत्रीच्या नात्याची जागा फार खास असते. मैत्रीचं नाते हे जगातील सर्वात खास नात्यांपैकी एक मानले जाते. भारतात दरवर्षी ऑगस्टच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यात येतो.
यंदा 2 ऑगस्ट 2020 रोजी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार आहे. म्हणूनच, रविवारी आलेल्या फ्रेंडशिप डे निमित्त झी टॉकीज मैत्रीचे नाते आणखी घट्ट करणारे काही सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ आज (रविवार) दुपारी 12 वाजता प्रसारित होणार आहे. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या त्रिकुटाच्या अभिनयाने नटलेला 1985 सालचा सुपरहिट विनोदी चित्रपट ‘धूम धडाका’ दुपारी 3 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
तसेच, अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा, सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपट संध्याकाळी 6 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे यंदाचा तुमचा फ्रेंडशिप डे जोरदार साजरा होणार हे नक्की.