नीरा डाव्या कालव्यातून आवर्तन सोडावे -पाटील

रेडा  -सध्या इंदापूर तालुक्‍यात पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील शेतीसाठी नीरा डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्यात यावे. 

त्याचप्रमाणे शेटफळ तलाव 100 टक्‍के क्षमतेने भरून घेण्यासाठी नीरा डावा कालव्यामधून तलावात पाणी सोडण्यास सुरुवात करावी, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांच्याकडे शनिवारी (दि.31) केली.

नीरा डावा कालव्याच्या इंदापूर तालुक्‍यातील फाटा क्र. 36 ते 59 वरील शेती पिकांना पावसाने ओढ दिल्याने सध्या पाण्याची गरज भासत आहे. त्यामुळे शनिवारी शेतकऱ्यांनी हर्षवर्धन पाटील

यांना भेटून शेतातील उभ्या पिकांसाठी खरीप आवर्तन सोडणे गरजेचे असल्याची मागणी केली. सध्या वीर, भाटघर, नीरा देवधर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरत आली आहेत.

परिणामी, नीरा डावा कालव्याचे आवर्तन सोडण्यात काही अडचण नाही. त्यामुळे जलसंपदाने तातडीने 59 फाट्यापासून चालू करावे, असे हर्षवर्धन पाटील नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.