1,175 जण करोनामुक्त : 992 नवे बाधित सापडले
पुणे – शहरात दिवसभरात नव्याने 992 करोना बाधित सापडले आहेत. मागील तीन दिवसांत बाधितांची संख्या कमी होत असल्यामुळे काहीसा दिलासा आहे. दिवसभरात करोनामुळे 13 बाधितांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तर आज सर्वाधिक 1, 175 जण करोनामुक्त झाले आहेत.
रविवारी (दि. 26) दिवसभरात 2, 506 संशयितांची नमुने तपासणी घेण्यात आली आहे. तर मागील दोन दिवसांतील तपासणी अहवालातील एकूण 2 हजार 290 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. मागील चार दिवसांपासून अत्यवस्थ बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील विविध रुग्णालयात एकूण 18 हजार 298 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 682 बाधितांची प्रकृती चिंताजनक आहे.
गेल्या 24 तासांत व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली असून, सध्या 105 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आले असून, 577 जण अतिदक्षता विभागात आहेत. रविवारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 28 हजार 593 जण करोनामुक्त झाले आहेत.
10 कोटी रुपयांचा जिल्ह्यासाठी निधी
करोना नियंत्रित करण्यासाठी कोविड केअर सेंटर स्थापन करणे, अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करणे, पीपीई किट, व्हेंटिलेटर, थर्मल स्कॅनर्स आदी खरेदी केली जाणार आहे. यात पुणे जिल्ह्यासाठी 10 कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. हा निधी विभागीय आयुक्त यांच्याद्वारे जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे.