नगर -करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या वर्षी गोरक्षनाथ गडावरील उत्सव व भंडारा स्थगित करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत भाविकांनी गडावर येऊ नये, असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.
श्रावण महिन्यात श्री गोरक्षनाथ गडावर महिनाभर दर्शन, देवाला पाणी घालणे, पारायण करणे, भंडारा( महाप्रसाद) आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात येतात. तथापि, या वर्षी करोनाचा प्रार्दूभाव असल्याने सरकारने देखील पुढील निर्णय येईपर्यंत मंदिर बंद ठेवावे, अशी विनंती केली आहे. त्यानुसार मंदिर देखील बंद राहणार आहे. तसेच गोरक्षनाथ गडावर जाण्याचे सर्वच मार्गही बंद करण्यात आलेले आहेत, अशी माहिती देवस्थान समितीतर्फे देण्यात आली आहे.