जळोची – बारामती समर्थनगर येथे काल रात्री छापा टाकून दोन किलो पेक्षा जास्त वजनाचा गांजा जप्त केला. दरम्यान, या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शना खाली सदर कारवाई करण्यात आली आहे.
बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुबर पाटील, सहा.पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, पोसई पी.आर.गंपले, वाय.ए.शेलार साो.पो.हवा.सातपुते, पो.ना.गोरवे,सिताप.पो.कॉ.गायकवाड, पो.कॉ.पाटील पो.कॉ.लाटणे, पो.कॉ.कुलकर्णी, पो.कॉ.कोकाटे, पो.कॉ.इंगोले.पो.कॉ.राउत, पो.कॉ.उमेश गायकवाड.पो.कॉ.अकबर शेख, म.पो.कॉ.किर्दक, यांनी अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती समर्थनगर येथे काल रात्री दोन पंचा समक्ष व जप्त मालाचे वजन करण्यासाठी किराणा दुकानदार भारत सुभाष मुथा यांचेसह अचानक छापा घातला असता सदर ठिकाणी बाई नामे वंदना ऊर्फ वंन्डी बाळु सोनवणे या मिळुन आल्या आरोपीच्या घरात झडती घेतली.
यावेळी घरातील घरगुती वापराची भांडी ठेवलेल्या खोलीमधील पाणी पिण्याचे कुंभार माठात प्लास्टिकचे पिशवीत गांजा लपवुन ठेवलेला व बेडरूमधील लोखंडी कपाटामध्ये पांढऱ्या कागदीपेपर मध्ये अखंड घटट गुंडाळलेला गांजाचा गट्टा मिळुन आला. पोलीसांनी अंदाजे ५३ हजार ३५० रुपये किंमतीचा २ किलो २६० ग्रॅम मादक पदार्थ गांजा व गांजा भरण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या सह मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलीस कॉस्टेबल अकबर शेख यांच्या फिर्यादीवरून भा.द.वि.कलम ३५३,५०६ सह एन.डी.पी.एस.ॲक्ट १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), ii./बी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयाचा तपास सहा.पोलीस निरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.सदरची कामगिरी अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक निरीक्षक औदुबर पाटील,सहा.पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, पो.स.ई.पी.आर.गंपले, वाय.ए.शेलार.सो.पो.हवा.सातपुते, पो.ना.गोरवे, ओकार सिताप पो.कॉ.राजेश गायकवाड, सिध्देश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे, योगेश कुलकर्णी, उमेश गायकवाड, दशरथ इंगोले, अजित राउत .अकबर शेख, म.पो.कॉ.किर्दक यांनी केली.