जळोची -बारामतीत शनिवार (दि.11) पुन्हा तीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बारामतीकरांची चिंता वाढली आहे. हा रुग्ण शहरातील पान गल्ली, वसंतनगर व जवळची येथील आहेत. यातील एक महिला रुग्ण आरोग्य कर्मचारी आहे. तर या रुग्णांमध्ये पंधरा वर्षीय मुलीचा समावेश आहे. पान गल्लीतील 48 वर्षीय व्यक्तीचा यात समावेश आहे.
शहरात बारामती पॅटर्न राबविण्यात आला होता. या पॅटर्नमुळे करोना साखळी तोडण्यात यश मिळाले होते. मात्र, अनेक दिवसांनंतर करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तरी पुन्हा बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नागरिकांकडून टाळेबंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्यामुळे शहरात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कडक अंमलबजावणीची आवश्यकता निर्माण झाली आहे.