राजगुरूनगर -खेड तालुक्यात 24 तासात 31 तर दिवसभरात 14 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.
खेड तालुक्यात 24 तासांत 31 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तालुक्यात करोना विषाणूचा फास आणखीच आवळू लागला आहे. करोना बाधित व्यक्तीच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.
आज दिवसभरात मेदनकरवाडी, संतोषनगर, वाकीखुर्द, चाकण, नाणेकरवाडी, दावडी, मोईमध्ये प्रत्येकी एक व्यक्ती, राजगुरूनगर 5 व्यक्ती तर पाईट येथे 2 व्यक्ती अशा 14 जणांचे करोना स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
धोका कायम
खेड तालुक्यातील औद्योगिकनगरीत करोनाचा कहर वाढल्यामुळे अर्थचक्र रुतण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न करूनही करोना रोखण्यात प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहे. त्यामुळे खेड तालुक्याभोवती धोका कायम आहे.