मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यात (दि. 6) तीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. महाळुंगे पडवळ येथील दोन महिला बाधित आहेत. एक तरुण मंचरचा आहे. तालुक्यात एकूण बाधित 65 असून, त्यापैकी 48 रुग्ण बरे झाले आहेत.
महाळुंगे पडवळ येथे दोन महिला बाधित आढळल्या आहेत, तर 33 वर्षीय तरुण मंचरचा आहे. हा तरुण मूळचा चास येथील असला तरी तो सध्या मंचर येथेच स्थायिक आहे. महाळुंगे पडवळ येथील परिसर प्रतिबंधक क्षेत्र घोषित केला आहे. संशयित 39 जणांचे रिपोर्ट बाकी असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले.
पंचायत समिती आरोग्य विभाग व ग्रामस्तरीय समिती यांन बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाइन केले आहे. 65 बाधित व्यक्तींपैकी 48 रुग्ण बरे झाले असून, दोन मयत आहेत. एकूण 15 रुग्णांपैकी भीमाशंकर हॉस्पिटल मंचर येथे 11 आणि पुणे रुग्णालयात 4 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले.