भवानीनगर (वार्ताहर) – काटेवाडी (ता. बारामती) येथे दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे काटेवाडी गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
गावातील मेडिकल व किराणा दुकान वगळून सर्व व्यवहार 14 दिवस बंद राहतील. सर्व किराणा दुकाने सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत चालू राहतील. शनिवारी (दि. 4) बैठक घेण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सभापती अनिता बारवकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच धीरज घुले, अमोल काटे, ग्राम विकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, पोलीस पाटील सचिन मोरे उपस्थित होते.