शिक्रापूर -केंदूर (ता. शिरूर) येथील महिला घरामध्ये असताना एका व्यक्तीने महिलेच्या घरात घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवत महिलेला शिवीगाळ, दमदाटी करीत तिचा विनयभंग केला. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एकावर गुन्हा दाखल केला आहे.
संदीप पांडुरंग पवार (रा. केंदूर, ता. शिरूर), असे नराधमाचे नाव आहे. महिला व तिच्या मुलीने पोलीस पाटलांना माहिती देत पोलीस स्टेशन गाठले. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर करीत आहेत.