काय आहे, आलिया भट्टच्या फिटनेसचे गुपित?

इतकी स्लिम आणि फिट कशी राहते आलिया भट्ट

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘आलिया भट्ट’ आपल्या फिटनेसाठी नेहमीच चर्चेत असते. तसेच आलिया इतरांना फिट राहण्याचे सल्ले देखील देत असते. ती इतकी स्लिम आणि फिट कशी राहते याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरते.

“मी नेहमी घरचं जेवण खाते आणि मला डाळ-भात जास्त आवडतो. तसेच माझं कम्फर्ट फूड खिचडी, फ्रेंच फ्राइज हे असून, मला फळंही आवडतात”. असं आलिया म्हणाली.

घरच्या जेवणात प्रिझर्वेटिव्ह्स नसतात. हीच घरच्या जेवणाची सर्वात मोठी खासियत असते. असं जेवण आपल्या शरीराला पोषण देतं आणि याने वजन कमी करण्यासही मदत होते. त्यामुळे तुम्ही हेल्दी राहता.

घरच्या जेवणात डाळ, भाज्या, चटणी, दही आणि दूध यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. याप्रकारे प्रोटीन, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि कार्बोहायड्रेटसारखे महत्वपूर्ण तत्व मिळवण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे घरचं जेवण हा आहे. असं आलिया म्हणते.

Leave A Reply

Your email address will not be published.