भारताचा मास्टरस्ट्रोक TikTok ला बसला ‘इतक्या’ हजार कोटींचा फटका

चीननंतर भारतात होते TikTok चे सर्वाधिक युझर

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. असे असताना चीन सरहद्दीवर कुरापती करीत आहे. त्यामुळे चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारताने घेतला असून, काही दिवसांपूर्वीच चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

दरम्यान, भारताने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाचे चीनला मोठे नुकसान होत असल्याचे चित्र समोर आले आहे. भारतात लोकप्रिय असणाऱ्या एकट्या TikTok ला तब्ब्ल 45 हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बाइटडांस कंपनीचे TikTok आणि Hello हे दोन अॅप्लिकेशन भारतात प्रचंड लोकप्रिय होते.

या अॅप्लिकेशनचे चीननंतर सर्वाधिक युझर भारतात होते. मात्र, आता त्यावर बंदी आल्याने भारतीयांच्या मोबाइल फोनमधून ते गायब झालेले आहेत. त्याचाच मोठा फटका संबंधित कंपनीला बसला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.