बेल्हे – सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क परिधान न करता बाहेर फिरणाऱ्या 119 जणांवर आळेफाटा पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अध्यादेश काढला होता. त्याप्रमाणे आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करणाऱ्या एकशे एकोणीस जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यात नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे मुजावर यांनी सांगितले.