मुंबई – अभिनेता ‘रितेश देशमुख’ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो, रितेश आणि जेलेनिया नेहमीच समाजातील अनेक मुद्द्यांवर संवेदनशीलपणे आपले मत मांडत असतात. नुकतंच या जोडीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये रितेश आणि जेनेलिया यांनी मृत्यूनंतर आपले अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जगात अवयव दान करणे, यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट कोणतीच असू शकत नाही, असाही संदेश त्यांनी सर्वांना दिला आहे.
There is no greater gift to someone than ‘The Gift Of Life’. @genelia & me have pledged to donate our organs. We urge you all to join this great cause and be part of ‘The Life AfterLife’. pic.twitter.com/dq4flMSxT6
— Riteish Deshmukh (@Riteishd) July 1, 2020
जेनेलियाने म्हंटले आहे, रितेश आणि मी बर्याच काळापासून याबद्दल विचार करत होतो परंतु दुर्दैवाने ते करता आले नाही. आज डॉक्टर डे दिवशी आम्ही आमच्या अवयवांचे दान करण्याची प्रतिज्ञा करतो आहोत. आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल आम्ही डॉ. नोझर शेअरी आणि एफओजीएसआयचे आभार मानू इच्छितो. आपण एखाद्यास देऊ शकणारी सर्वात मोठी भेट म्हणजे ‘जीवनाची भेट’ आहे. आम्ही आपणा सर्वांना विनंती करतो की या आरंभात तुम्हीही सहभागी व्हा आणि एखादा जीव वाचविण्याची प्रतिज्ञा करा, आपल्या अवयवांचे दान करण्याची प्रतिज्ञा करा.