589 दिवसभरात करोनामुक्त
पुणे – शहरात करोना विषाणूचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून, बुधवारी बाधिताच्या संख्येने पुन्हा तब्बल 877 चा आकडा पार करत आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. दुसरीकडे बरे होणाऱ्याची संख्याही उच्चांक गाठत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.
गुरुवारी दिवसभरात 589 जणांना घरी सोडले असून, आतापर्यंत 11 हजार 4 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच दिवसभरात करोनामुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
दि.27 जून रोजी सर्वाधिक 822 बाधित सापडल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. स्वॅब तपासणीची संख्या वाढल्यामुळे बाधितांचा आकडा वाढल्याचे महापालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मागील दहा दिवसांपासून बाधितांची संख्या पाचशे पार असून, बाधितांची एकूण संख्या 18 हजार 105 पर्यंत पोहचली आहे.
दरम्यान, बुधवारी (दि. 1) दिवसभरात आणखी 4 हजार 68 स्वॅब घेण्यात आले. सद्यस्थितीत शहरात 6,403 बाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यातील 347 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, 55 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे. तर, सुामरे 13,441 व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.