भारतात टिकटॉकसह 59 चिनी अॅपवर बंदी घातली आहे. त्यानंतर यूजर्सने टिकटाॅकला पर्याय शोधला आहे. टिकटॉक ज्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीने काम करणारे एक अॅप भारतातील एका कंपनीने विकसित केले आहे.
चिंगारी नावाच्या या अॅपला भारतीय नेटकऱ्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अतिशय कमी वेळेत 25 लाख पेक्षा अधिक लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. टिकटॉक बॅनचा चांगलाच फायदा ‘चिंगारी’ (Chingari)या एका मेड इन इंडिया मोबाइल अॅपला झाला आहे.
चिंगारी अॅप कसे काम करते…
चिंगारी अॅपच्या माध्यमातून व्हिडीओ डाऊनलोड करता येतात किंवा अपलोड करता येतात. त्याचबरोबर मित्राशी व्हिडीओ संवाद साधता येतो. तसेच यामध्ये व्हाॅटसअॅप स्टेटस, व्हिडीओ, अॅडियो क्लिप्स, जीआयएफ स्टिकर्स आणि फोटोसोबत क्रिएटिविटी करता येते.
9 भाषेत उपलब्ध…
चिंगारी अॅप इंग्रजी व्यतिरिक्त अन्य नऊ भाषेत उपलब्ध आहे. ज्यामध्ये हिंदी, बांग्ला, गुजराती, मराठी, कन्नड़, पंजाबी मलयालम, तमिल आणि तेलगू या भाष्यांचा समावेश आहे.
गूगल प्ले वर ट्रेडिंग….
चिंगारी ऍप विकसित करणाऱ्या कंपनीचे सहसंस्थापक विश्वात्मा नायक यांनी सांगितले की, भारतीय नागरिकांत हे अॅप वेगाने लोकप्रिय होत असून रोज डाऊनलोड करणाऱ्यांच्या संख्येत 400 टक्क्यांनी वाढ होत आहे आणि आम्हाला अपेक्षापेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच टिकटाॅक बॅन होताच चिंगारी अॅपने गूगल प्ले स्टोरवर टाॅप ट्रेंडिग अॅपमध्ये स्थान मिळवले आहे.
अॅपमध्ये गुंतवणूक करण्यास अनेकजण उत्सुक…
चिंगारी अॅपला मिळणारा प्रतिसाद पाहता अनेक गुंतवणूकदारांनी या अॅपमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा दाखवली आहे. हे अॅप विकसित करणाऱ्यांनी म्हटले आहे की, जर चांगले गुंतवणूकदार भेटले तर या अॅपला आम्ही आतापेक्षा अधिक शानदार बनवू.