मुंबई – कोरोना व्हायरस मुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. असे असताना चीन सरहद्दीवर कुरापती करीत आहे. त्यामुळे चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असून केंद्र सरकारनेही 69 चिनी अॅपवर बंदी आणली आहे.
दरम्यान, आता याचा फायदा अमेरिकी कंपन्यांनी उठविण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माती कंपनी अॅपलने पॉप्युलर फोन Apple iPhone XS Max वर मोठा डिस्काऊंट देऊ केला आहे. अॅमेझॉनवर हा फोन एमआरपीपेक्षा 40 हजार रुपयांनी कमी किंमतीत मिळत आहे. अॅपलने मूळ किंमतीमध्ये 36 टक्क्यांची कपात केली आहे. तसेच आयफोन XS मॅक्स हा जगातील सर्वात वेगवान फोन असल्याचा दावाही कंपनीनं काही दिवसांपूर्वी केला होता.
फक्त गोल्ड व्हेरियंटवर डिस्काउंट
36 टक्के डिस्काउंटचा लाभ फोनच्या गोल्ड कलर व्हेरियंटवर दिला जात आहे. हा फोन तीन रंगामध्ये उपलब्ध आहे. फोनचा सिल्वर कलर व्हेरियंट (64 जीबी) सध्या वेबसाइटवर आउट ऑफ स्टॉक दिसत आहे. तर फोनचा स्पेस ग्रे कलर आता 68 हजार 900 रुपयांच्या टॅगसोबत लिस्ट करण्यात आला आहे.