मुंबई : जगाला हतबल करणाऱ्या करोनावर ‘कोरोनिल’ हे औषध काढल्याचा दावा योगगुरू रामदेव बाबा यांनी केला होता. मात्र आता राज्य सरकारने पतंजलीला मोठा झटका दिला आहे. राजस्थान सरकारपाठोपाठ पतंजलीच्या कोरोनिल वर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. तर देशभरातून त्यांच्यावर अनेक एफआईआर दाखल करण्यात आल्या आहे.
Patanjali claims that “#COVID19 patients group that received its medicines, showed 67% recovery in 3 days & 100% recovery in 7 days of treatment, that is, all 45 patients became COVID negative”; says all clinical trial documents have been shared with AYUSH Ministry. pic.twitter.com/jSMTxCwLp8
— ANI (@ANI) July 1, 2020
याच पार्श्वभूमीवर रामदेव रामदेव बाबा हे प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये म्हणाले,’ करोनावर ‘कोरोनिल’ हे औषधा काढण्याचा चांगला पुढाकार घेतला आहे. मात्र लोक आमच्यावर आरोप लावत आहे. तुम्ही आमच्यावर आरोप करा मात्र त्या लोकांना सहानुभूती त्या जे कोरोनाग्रस्त आहे.
ते पुढे म्हणाले,’असे वाटतेय की भारतात योग आयुर्वेदाचे काम करणे गुन्हा आहे. आमच्यावर शेकडो ठिकाणी एफआईआर दर्ज करण्यात आल्या आहे. जैसे की कुठल्या देशद्रोही आणि दहशतवाद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येतो.’ असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.