नवी दिल्ली – आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संवादाच्या अनेक साधनांचा वापर माणसाकडून केला जातोय, मोबाईल फोन हे त्यापैकीच एक… आज हे साधन प्रत्येकाची गरज बनलं आहे. दरम्यान, तुम्ही सुद्धा लॉकडाऊनमध्ये नवीन मोबाइल घेण्याच्या विचारात असाल तर खालील बातमी नक्की वाचा…
नुकतंच हॉनर कंपनीने आपला नवीन दमदार मिड बजेट रेंजचा HONOR 9A हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन सर्वसामान्यांना परवडणारा आहे.
जाणून घ्या HONOR 9A स्मार्टफोन चे फीचर्स –
With 5000mAh Big Battery, 64GB big storage and Ultra-wide Triple camera, the #HONOR9A – is now here! What features excite you the most? Tell us now! #HONOR9A #PowerYourLife pic.twitter.com/TYVU1iz4oQ
— HONOR (@Honorglobal) June 24, 2020
या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असून 33 तासांचे 4G कॉल्स, 35 तासांचे व्हिडिओ प्ले आणि 37 तासांचा FM रेडिओ प्ले मोबाईल एकदा चार्ज करुन वापरु शकतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
HONOR 9A चा 3GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमरी असलेला वेरिएंट हा 149.9 युरोजला उपलब्ध आहे. भारतातील याची किंमत आणि उपलब्धता याची माहिती लवकरच देण्यात येईल.
तसेच, हॉनर कंपनीने या स्मार्टफोनचे अपग्रेडेड व्हर्जन HONOR MagicBook 14 या नावाने लॉन्च करण्याचे जाहीर केले आहे.