चायना माल विकणार नसल्याची केली घोषणा
नगर (प्रतिनिधी) – चीनने भारतीय सिमेत घुसखोरी करुन, भारतीय जवानांवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ अहमदनगर बेकरी असोसिएशन ऍण्ड बेकरी रॉ मटेरियल विक्रेत्यांच्या वतीने तेलीखुंट येथे चायना मालाची होळी करुन बेकरीमध्ये कोणत्याही प्रकारचा चायना माल घेणार नाही. व विकाणार नसल्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी असोसिएशनचे मानसिंग परदेशी, ए.आर. ट्रेडर्सचे समीर शेख, विनोद कराचीवाला, इंदर बजाज, हाजी फर्मान, शेख, इकराम शेख, मतीन गुलाब, इमरान शेख, हाजी चांद, रेहान शेख, जमीर शेख, तनवीर शेख, इलियास शेख, तय्यब शेख आदींसह बेकर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
केक बनविण्यासह व वाढदिवस साजरा करताना लागणारे विविध साहित्यात चायना मालाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. हा चायना माल बेकरीधारक घेणार नाही व विकणार नसल्याचे मानसिंग परदेशी व समीर शेख यांनी सांगितले.