सातारा : कोणत्याही प्रकारे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात बंदी असतानाही खिंडवाडीमधील हॉटेल सातारा पॅलेसमध्ये एका डॉक्टरच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिसांनी हॉटेल मालकासह २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
हॉटेल सातारा पॅलेसचे मालक कमलेश निकम, अमोल घाडगे, दत्तात्रय कमाणे, दत्तात्रय धुमाळ, इंद्रजीत ताटे यांच्यासह इतर १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डॉ. ठोके यांच्या मुलाचा शनिवार दि. २० रोजी वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी संबंधित लोक रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेल सातारा पॅलेसमध्ये एकत्र आले होते.
या हॉटेलमध्ये दारू विक्रीचा परवाना नसताना व पिण्याची परवानगी नसतानाही परवानगी देऊन जिल्हाधिकाºयांचे आदेशाचे हॉटेल मालकाने उल्लंघन केले. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.