मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीतील वातावरण तापले असून येथील घराणेशाही आणि कंपूशाहीविरूध्द बातम्यांनी सोशल मीडिया ढवळून निघाला आहे. काही ज्येष्ठ आणि दिग्गज कलाकार मंडळींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असताना आता सुशांतने ही आत्महत्या बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळूनच केल्याचा थेट आरोप होतो आहे. त्यातच या घराणेशाहीमागे सलमान खान जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे.
A request to all my fans to stand with sushant’s fans n not to go by the language n the curses used but to go with the emotion behind it. Pls support n stand by his family n fans as the loss of a loved one is extremely painful.
— Salman Khan (@BeingSalmanKhan) June 20, 2020
दरम्यान, सोशल मीडियावर सलमान खानचे चाहते व सुशांतचे चाहते यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आहे. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून सुशांतचे चाहते सलमानविरोधात ट्विट, पोस्ट करत आहेत. त्याला सलमानचे चाहते सोशल मीडियावर उत्तर देत आहेत. सलमानने ट्विट करत चाहत्यांना ही विनंती केली आहे.
सलमाने ट्विट केले की,’मी माझ्या सर्व चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी सुशांतच्या चाहत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. त्याच्या चाहत्यांनी वापरलेल्या भाषेचा किंवा शापाचा विचार करू नका, मात्र त्यामागील त्यांच्या भावनांना समजून घ्या. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, ती व्यक्ती गमावणे हे सर्वांत जास्त दु:खदायक असतं. त्यामुळे सुशांतच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या चाहत्यांना साथ द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा,’ असं ट्विट सलमानने केलंय.