मुंबई – वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेते, लेखक व दिग्दर्शक ‘प्रविण विठ्ठल तरडे’ यांनी फादर्स डे निमित्त आपल्या वडिलांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. आपली दु:ख मनात ठेवून कायम मुलांसाठी, कुटुंबासाठी चेहऱ्यावर हसू फुलवतो… त्या वडिलांचे आभार मानण्यासाठी फादर्स डे साजरा केला जातो.
प्रवीण तरडे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. तरडे म्हणाले कि, “माझ्या सिनेमात अनेक कलाकारांनी काम केलय.. या ७५ वर्षांच्या कलाकाराने सुध्दा”मुळशी पॅटर्न”मधे एका शेतकऱ्याचं काम केलय.पहिल्याच टेक ला शाॅट ओके, अजुन एक टेक घ्यायचा का.? असं विचारलं तर म्हणाला ओ तरडे, हाडाचा शेतकरी आहे. मी, शेतात “बी” एकदाच पेरायचं असतं आणि कसं पेरलय ते उकरून नाय तर उगवून आल्यावरच बघायचं..त्या कलाकाराचं नाव ह.भ.प विठ्ठल किसन तरडे..”बाप तो बाप होता है, Happy Father’s Day” असं ते म्हणाले.