दौंड : दौंड शहरातील पाच अल्पवयीन मुलांसह एका जेष्ठ महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरामध्ये सध्या कोरोना बाधित रुग्णामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे दौंडकरांनी आता सावधानता बाळगण्याची गरज आहे. शनिवारी (दि. 13) दौंड शहरातील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. एक वयोवृद्ध महिला देखील करोना बाधित आढळून आली आहे, अशी माहिती दौंडचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
दौंडमध्ये कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. येथील करोना बाधित रुग्णाच्या संपर्कांत आलेल्या 23 जणांची करोना तपासणी करण्यात आली आहे. यातील 22 जणांचे वैद्यकीय अहवाल शनिवारी मिळाले आहेत. त्यातील 6 जणांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.तर एका ज्येष्ठ महिलेचा समावेश आहे. या 6 करोना बाधितांमध्ये 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेसह 13 ते 17 वयोगटातील अल्पवयीन मुले व मुलींचा समावेश आहे.