सिंगापूर – सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे तेथे नागरिकांना मास्क लावण्याची सूचना सरकारने केली आहे. आठवड्याभरात कोविडच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढल्याचे आढळून आले आहे. (Cases double, masks back: Is Singapore bracing for a COVID-19 comeback?)
आता तरी कोणतेही निर्बंध घालण्याची आवश्यकता नाही. मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असे आरोग्य मंत्री ओंग ये कुंगयांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात कोविड रुग्णांची संख्या १३, ५०० होती ती या आठवड्यात २५ हजारांवर पोचली आहे.