बॉलीवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच ही तिच्या चित्रपटांपेक्षा भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी असलेल्या संबंधांमुळे चर्चेत असते. हार्दिकने नताशाशी साखरपुडा करून सर्वांना चकित केले होते. आता हार्दिक पांड्याने आणखी एक गुड न्यूज शेअर केली आहे. नताशा लवकरच हार्दिकच्या मुलाची आई होणार आहे.
या फोटोसह हार्दिकने एक भावनिक पोस्ट देखील लिहिले आहे. त्याने लिहिले आहे की, नताशा आणि माझा एक खूपच सुंदर असा प्रवास सुरू आहे आणि तो आणखी चांगला होणार आहे. आम्ही लवकरच एकाला नवीन जीवाला जन्म देणार आहोत. तर नताशाने तिच्या बेबीशॉवरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सध्या लॉकडाउन असल्यामुळे या जोडीने घरच्या घरीच नताशाचं बेबीशॉवर (डोहाळजेवण) केलं आहे. याचे काही फोटो शेअर करत, मी आणि हार्दिकने एकत्र मिळून एक मोठा प्रवास केला आहे. त्यामुळे आमच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आम्ही फार आनंदित आहोत, असं कॅप्शन नताशाने या फोटोला दिलं आहे.