सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आणखी सात जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रशासनाने गुरुवारी सकाळी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या ५७८ झाली आहे. २३५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २४ जणांचा करोनामुळे म्रुत्यू झाला आहे.
बुधवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार सातारा जिल्हयातील ७ जणांचे रिपोर्ट करोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये कराड तालुक्यातील खराडे येथील १५ वर्षीय युवक व शिंदेवाडी विंग येथील १५ वर्षीय युवक, शेणोली स्टेशन येथील १४ वर्षीय युवती, वाई तालुक्यातील डुईचीवाडी येथील १५ वर्षीय युवती, सातारा तालुक्यातील कुस बुद्रुक येथील १६ वर्षीय युवक, खटाव तालुक्यातील निढळ येथील २६ वर्षीय् महिला तसेच कारंडवाडी ( देगाव रोड ता.सातारा) येथील ६५ वर्षीय महिला.